चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीस अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:03 AM2021-08-03T11:03:49+5:302021-08-03T11:04:16+5:30

Crime News: कळवा येथील सुकूर पार्क या इमारतीत राहणाऱ्या संजय हा माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून पसार झाला होता.

Murder of wife out of suspicion of character; Thirty-five finally arrested | चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीस अखेर अटक

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीस अखेर अटक

Next

 ठाणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नी माधुरी संजय पाटील (३१, रा.कळवा, ठाणे) हिची हत्या करणारा आरोपी पती संजय (३९) याला कळवा पोलिसांनी नुकतीच वाराणसीतून अटक केली आहे. त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कळवा येथील सुकूर पार्क या इमारतीत राहणाऱ्या संजय हा माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून पसार झाला होता. माहेरच्या मंडळींनी तिला संपर्क साधूनही तो न झाल्यामुळे २४ जुलै रोजी हा प्रकार उघड झाला. संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याच्यावर कर्जही झाले होते. त्याने काही जणांची फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरून या दांपत्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. माधुरी पार्लरमध्ये काम करीत असून, तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून झालेला वाद चिघळल्याने त्याने माधुरीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिचा खून केला. हत्येनंतर सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून मोबाइल बंद करून तो पसार झाला होता. या प्रकरणी २५ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी आणि निरीक्षक सुदेश अजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोंटे आणि उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ३१ जुलै रोजी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Murder of wife out of suspicion of character; Thirty-five finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.