पुणे : रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़. रामदास शामराव शिळीमकर (वय ३८, रा़ धनकवडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. ही घटना धनकवडी येथील शेवटचा बसस्टॉपजवळील योगी सोसायटीसमोरील रोडवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला़. याप्रकरणी विकास चव्हाण (वय. ४४, रा़. चव्हाणवाडा, धनकवडी, गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे़. सहकारनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर वानखेडे व त्याचा भाऊ आणि मेव्हण्यावर गुन्हा दाखल केला आहे़.
पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 15:19 IST
रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़.
पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन
ठळक मुद्देप्लास्टिक पिशवी ठरली काळ