अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 21:34 IST2021-02-07T21:33:44+5:302021-02-07T21:34:12+5:30

Murder : आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कहाळे करीत आहेत.

Murder of two in an immoral relationship; The accused was handcuffed within hours | अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या

अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देसफाळे पश्चिमेला असलेल्या ठाकुर पाडा येथील आरोपी दिलीप ठाकरे (वय 45)ह्याची पत्नी संगीता(40 वर्ष) हिचे तिचा भावोजी पांडू श्रावणे(वय 42 वर्ष)( बहिणीचा पती) सोबत अनैतिक संबंध होते.

पालघर/सफाळे - तालुक्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील कपासे ठाकूर पाडा येथे आरोपीने आपल्या पत्नीसह तिच्या भावोजीची अनैतिक संबंधातून हत्या केली असून सफाळे पोलिसांकडून आरोपीला काही तासाच अटक करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
   

पोलीस सूत्रानुसार, सफाळे पश्चिमेला असलेल्या ठाकुर पाडा येथील आरोपी दिलीप ठाकरे (वय 45)ह्याची पत्नी संगीता(40 वर्ष) हिचे तिचा भावोजी पांडू श्रावणे(वय 42 वर्ष)( बहिणीचा पती) सोबत अनैतिक संबंध होते.आरोपीने आपल्या पत्नीला अनेक वेळा आक्षेपार्ह अवस्थेत त्यांना पकडले असताना त्यांना अनेक वेळा समजावून सांगून ही त्यांच्या वर्तनात कुठलाही बदल घडून येत न्हवता.आज आरोपी दिलीप हा कामावर गेला असताना तो अचानक घरी आला त्याने घराचा हळूच दरवाजा उघडला असता त्याची पत्नी झोपलेल्या अवस्थेत तर तिच्या बाजूला तिचा भावोजी आक्षेपार्ह अवस्थेत झोपल्याचे दिसून आले.त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने घरातील कुऱ्हाडीने त्या दोघांची हत्या केली.काही तासातच आरोपीला पकडण्यात सफाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सपोनि संदीप कहाळे आणि त्याच्या टीम ला यश आले. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कहाळे करीत आहेत.

Web Title: Murder of two in an immoral relationship; The accused was handcuffed within hours