पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:17 IST2020-05-26T11:17:20+5:302020-05-26T11:17:56+5:30

ही घटना गंगानगरमधील स्मशानभूमीजवळ आज सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.

Murder by throwing stones at the head of a young man in Pune rkp | पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून 

पुण्यात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून 

पुणे : हडपसरमधील गंगानगर येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बसवराज कांबळे (वय २३, रा. गंगानगर, हडपसर) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना गंगानगरमधील स्मशानभूमीजवळ आज सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे हे घटनास्थळी दाखल झाले असून हडपसर पोलीस अधिक माहिती घेत आहेत. बसवराज कांबळे याच्या घरापासून काही अंतरावर हा प्रकार घडला आहे. या खुनामागील कारण अद्याप समजले नसून आरोपीने अज्ञात कारणावरुन कांबळे याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासावरुन दिसून येत आहे.

घटनास्थळी पोलिसांना रक्त लागलेला दगड आढळून आला आहे़. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Murder by throwing stones at the head of a young man in Pune rkp