... अन् कोंबडीच्या पिसांनी उलगडला 'मर्डर सस्पेन्स', महिलेच्या खुनातील आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:46 IST2019-07-09T14:41:59+5:302019-07-09T14:46:37+5:30

महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक ; ग्रामीण पोलिसांची कारवाई 

Murder suspension opened due to hen's feather, accused of murder of woman arrested | ... अन् कोंबडीच्या पिसांनी उलगडला 'मर्डर सस्पेन्स', महिलेच्या खुनातील आरोपी जेरबंद

... अन् कोंबडीच्या पिसांनी उलगडला 'मर्डर सस्पेन्स', महिलेच्या खुनातील आरोपी जेरबंद

ठळक मुद्देमहिलेला गोणीत भरुन नेताना कोंबडीची पिसे लागली होती. आलम याने मृत महिलेकडून अडीच लाख रुपये घेतले होते.अनैतिक संबंध आणि पैशांच्या तगादयातून मोना या महिलेची तीच्या घरात गळा दाबून हत्या केली.

ठाणे - हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आलम शेख याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून अटक केली. त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरु आहे. अनैतिक संबंध आणि पैशांच्या तगादयातून मोना या महिलेची तीच्या घरात गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. ही हत्या 22 जून रोजी करण्यात आली होती. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. महिलेला गोणीत भरुन नेताना कोंबडीची पिसे लागली होती. त्यावरून हा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व्यंकट आंधळे यांनी दिली. तसेच आलम याने मृत महिलेकडून अडीच लाख रुपये घेतले होते.



 

Web Title: Murder suspension opened due to hen's feather, accused of murder of woman arrested