जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:55 IST2021-05-19T15:55:04+5:302021-05-19T15:55:57+5:30
Murder Case : त्यांचे जमिनीवरून जुने वाद होते. आरोपी संतोष बन्साेड हा हमालीचे काम करतो. पहाटे उठून दररोज तो कामाला जायचा.

जुन्या वादातून दगड, काठ्यांनी मारून घराशेजारील इसमाचा खून
गोंदिया : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका हमालाने घराशेजारील इसमाला दगड व काठ्यांनी मारून खून केल्याची घटना १९ मे च्या पहाटे ४.३० वाजता घडली. सुधीर रमेश सुर्यवंशी (३७) रा. गांधी वॉर्ड जूना गोंदिया असे मृताचे नाव आहे. तर संतोष बन्साेड (३०) रा. गांधीवॉर्ड जुना गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
त्यांचे जमिनीवरून जुने वाद होते. आरोपी संतोष बन्साेड हा हमालीचे काम करतो. पहाटे उठून दररोज तो कामाला जायचा. नेहमी प्रमाणे तो कामाला जाण्यासाठी निघाला असतांना खर्रा घेण्यासाठी मोहल्यातीलच एका पानटपरीजवळ थांबला. यावेळी मृतक सुधीर सुर्यवंशी हा घराकडून मोटारसायकलने आला. त्याच्या मोटारसायलने संतोषला धडक दिली. यात त्यांच्यात वाद झाला. परिणामी संतोषने काठीने मारून सुधीरला ठार केले. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत.