पारडीत एकाची हत्या, तीन दिवसांपूर्वी आढळला होता मृतदेह; वैद्यकीय अहवालातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 22:57 IST2021-01-16T22:56:43+5:302021-01-16T22:57:25+5:30
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.

पारडीत एकाची हत्या, तीन दिवसांपूर्वी आढळला होता मृतदेह; वैद्यकीय अहवालातून खुलासा
नागपूर - पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी शनिवारी रात्री पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
मृत व्यक्ती अंदाजे २५ ते ३० वर्षांचा आहे. पारडीतील सारडा लेआऊटमध्ये एका भूखंडावर त्याचा मृतदेह १३ जानेवारीच्या दुपारी आढळला होता. पोलिसांनी तो मेडिकलमध्ये पाठविला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तिकडे पोलिसांनी मृत व्यक्तीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला नाही तर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी वृद्यकीय अहवालात नमूद केले. त्यामुळे शनिवारी रात्री या प्रकरणी पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच मारेकऱ्यालाही ताब्यात घेऊ असा विश्वास ठाणेदार सुनील गांगुर्डे यांनी व्यक्त केला.
----