धक्कादायक! राजस्थानमध्ये साधूची हत्या, ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह नदीकाठी सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:34 IST2022-12-21T15:28:47+5:302022-12-21T15:34:29+5:30
राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साधूची हत्या करुन मृतदेहाचे चार तुकडे करुन नदी काठावर फेकल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! राजस्थानमध्ये साधूची हत्या, ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह नदीकाठी सापडला
राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साधूची हत्या करुन मृतदेहाचे चार तुकडे करुन नदी काठावर फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या हत्येसंदर्भात अजुनही पोलिसांनी माहिती मिळालेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बारी उपविभागातील कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती. भीमगड येथे बुधवारी साधूच्या वेशात एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांचा जमाव तेथे जमा झाला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. कांचनपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ब्लँकेटमध्ये गुंडळलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. शेरखान भीमगढ असं त्या व्यक्तीच नाव आहे. त्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वीच धर्मांतर केले असल्याची माहिती समोर आली आहे.
लग्न ठरल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड विरोधात तरूणीची पोलिसात तक्रार, 15 दिवसांवर आलं होतं तिचं लग्न
गेल्या अनेक वर्षांपासून तो व्यक्ती एका मंदिरात पूजा करत होता. मंदिरा जवळच एक गुहा आहे. त्यात काही संतांचे वास्तव्य असायचे. तो साधू घटनास्थळावरून बेपत्ता झाला तेव्हा पासूनच हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भावुद्दीन रविवारपासून मंदिरातून बेपत्ता होता. गावातील त्याचे कुटुंबीय त्याला रोज चहा द्यायला जायचे. मात्र रविवारपासून तो गायब होता.
तो व्यक्ती बेपत्ता झाल्याची बातमी गावात पसरल्याने गावकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी बराच वेळ शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही शोध लागला नाही. बुधवारी सकाळी गावकरी पुन्हा जमा होऊन शोध घेऊ लागले. बामणी नदीच्या पात्रात असलेल्या नाल्यात मृतदेह पाण्याजवळ पडलेला आढळून आला. घटनेनंतर कांचनपूरचे एसएचओ हेमराज शर्मा यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत.