जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने महिलेचा खुन; इंदापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 21:38 IST2022-10-10T21:37:17+5:302022-10-10T21:38:40+5:30

इंदापूर येथील महिलेचा जातीय द्वेषातुन जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने खुन करण्यात आला आहे.

Murder of a woman with a sharp weapon, bearing the grudge of an old quarrel; Incident in Indapur | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने महिलेचा खुन; इंदापूरमधील घटना

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने महिलेचा खुन; इंदापूरमधील घटना

लाकडी ता. इंदापूर येथील महिलेचा जातीय द्वेषातुन जुन्या भांडणाचा राग मनात धरुन धारदार शस्त्राने खुन करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली शेखर काटे रा. लाकडी ता. इंदापुर या महिलेचा सोमवार दि १० रोजी सकाळी लाकडी गावात खून झाला आहे. 

याप्रकरणी ललेंद्र मारुती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून राजेंद्र रामचंद्र जराड  रा उदमईवाडी ता . इंदापुर यांच्यावर खुनाचा व अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून जातीय द्वेषातुन धारदार लोखंडी हत्याराने गळा चिरून खुन करण्यात आला आहे. सदर घटनेनंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बारामती येथील खाजगी रुग्णालयात पोलिस निगराणीखाली उपचार सुरू आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत.

Web Title: Murder of a woman with a sharp weapon, bearing the grudge of an old quarrel; Incident in Indapur