फणस खराब निघाल्याने भाजी विक्रेत्याचा केला खून, जाणून घ्या कुठलं आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 21:10 IST2022-06-27T21:09:41+5:302022-06-27T21:10:56+5:30
Murder Case : संदीप नावाच्या व्यक्तीने अनिल नावाच्या व्यक्तीकडून फणस विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.

फणस खराब निघाल्याने भाजी विक्रेत्याचा केला खून, जाणून घ्या कुठलं आहे हे प्रकरण?
गाझियाबाद : गाझियाबादमधील मधुबन बापू धाम परिसरात गुरुवारी संध्याकाळी फणस खराब निघाल्याने एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली. संदीप नावाच्या व्यक्तीने अनिल नावाच्या व्यक्तीकडून फणस विकत घेतल्याचे सांगितले जात आहे. फणस खराब निघाल्यावर संदीप फणस परत करायला गेला, तेव्हा संदीपचे अनिल जो फणस विकणारा होता त्याच्याशी भांडण झाले.
अनिल म्हणाला तू फणस परत कर, मी पैसे परत करीन. मात्र, संदीपला राग आल्याने त्याने बॅटरी लाईटच्या स्टँडने अनिलला एवढी बेदम मारहाण केली, त्यानंतर अनिलचा शुक्रवारी मृत्यू झाला. सध्या पोलीस संदीपचा शोध घेत आहेत. कवी नगर पोलीस ठाण्याच्या बापू धाममध्ये असलेल्या मोर्टा गावात ३८ वर्षांचा अनिल कुमार भाजी विकायचा.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी संध्याकाळी संदीपने अनिलकडून फणस विकत घेतला होता. पण, थोड्या वेळाने संदीप परत आला आणि त्याने अनिलला फणस खराब निघाल्याचे सांगितले. काही वेळातच दोघांमध्ये वादावादी होऊन भांडण सुरू झाले. यानंतर ग्राहकाने रस्त्यावरील विक्रेत्याला लावलेला एलईडी लाईटचा स्टँड उचलून भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर गर्दीत उभ्या असलेल्या लोकांनी भाजी विक्रेत्याला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.