'प्रेयसीचं भूत खूप त्रास देत आहे, भिती वाटते...', प्रियकराचा जबाब ऐकून पोलीस हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 09:29 IST2023-01-12T09:27:35+5:302023-01-12T09:29:51+5:30

Crime News : बुधवारी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह खड्ड्यातून काढण्यात आला. आरोपी गोपाल खडियाने पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर त्याच्या प्रेयसीच भूत त्याला त्रास देत आहे.

Murder mystery solved girl skeleton found in jungle police arrested boyfriend in Chhattisgarh | 'प्रेयसीचं भूत खूप त्रास देत आहे, भिती वाटते...', प्रियकराचा जबाब ऐकून पोलीस हैराण...

'प्रेयसीचं भूत खूप त्रास देत आहे, भिती वाटते...', प्रियकराचा जबाब ऐकून पोलीस हैराण...

Crime News : छत्तीसगढच्या कोरबामधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेयसी लग्नाचा दबाव टाकत असल्याने प्रियकराने तिची हत्या केली होती. हत्येच्या सहा महिन्यांनंतर पोलिसांनी हत्येचा खुलासा केला आहे. रिसदी भागात राहणारी अंजू यादवची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात 20 फूट खोल खड्डा करून पुरण्यात आला होता. बुधवारी पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह खड्ड्यातून काढण्यात आला. आरोपी गोपाल खडियाने पोलिसांना सांगितलं की, हत्येनंतर त्याच्या प्रेयसीच भूत त्याला त्रास देत आहे. ज्यामुळे तो घाबरून घाबरून जगत आहे.

असं सांगण्यात आलं की, तरूणी 8 महिन्यांपासून बेपत्ता होती आणि कुटुंबियांनी याबाबत पोलिसातही तक्रार नोंदवली होती. 24 वर्षीय अंजू 8 महिन्यांपासून गायब होती. तिच्या आईने गोपाल खडियावर संशय व्यक्त केला होता. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर कुटुंबिय एसपीकडे गेले आणि तेव्हा पोलिसांनी गंभीरतेने चौकशी सुरू केली.

मृत तरूणीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी गोपाल याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीने सांगितलं की, तो विटाच्या भट्टीवर ड्रायव्हर आहे आणि अंजू इथे मजुरी करत होती. दोघांची तिथेच भेट झाली आणि काही दिवसात ते प्रेमात पडले. त्यांचं नातं तीन वर्ष चाललं.

अंजू नंतर त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये नेहमीच भांडणही होत होतं. याला वैतागून त्याने अंजूला मारण्याचा प्लान केला. तो प्रेयसीला काही सांगून ढेलवाडीहच्या सागवानाच्या नर्सरीमध्ये घेऊन गेला. इथे त्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर खड्डा करून तिथेच मृतदेह पुरला. त्याने पोलिसांना हेही सांगितलं की, हत्येनंतर त्याच्या प्रेयसीचं भूत त्याला त्रास देत आहे. ज्यामुळे त्याचं शांतपणे जगणं मुश्किल झालं आहे.

Web Title: Murder mystery solved girl skeleton found in jungle police arrested boyfriend in Chhattisgarh