Murder of Mayank Tutorial Owner in ghatkopar | खळबळजनक! मयंक ट्युटोरियलच्या मालकाची हत्या 

खळबळजनक! मयंक ट्युटोरियलच्या मालकाची हत्या 

ठळक मुद्दे ट्यूटोरियलमधील कर्मचारी गणेश पवार याने क्लासमध्येच चॉपरने मयंक यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्यानेमकं कोणत्या कारणामुळे गणेश पवारने मालकाची हत्या केली याचा उलगडा पोलीस करत आहेत. ही घटना आज सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. 

मुंबई - घाटकोपर परिसरातील मयंक ट्यूटोरियलच्या मालकाची हत्या झाली असून पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयंक मंडाेप असं मृत ट्युटोरियल मालकाचे नाव आहे. ट्यूटोरियलमधील कर्मचारी गणेश पवार याने क्लासमध्येच चॉपरने मयंक यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पवारला ताब्यात घेत घेतले आहे. ही घटना आज सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.  पोलीस या हत्येप्रकरणी पुढील तपास करत असून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे गणेश पवारने मालकाची हत्या केली याचा उलगडा पोलीस करत आहेत. 

Web Title: Murder of Mayank Tutorial Owner in ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.