२० रुपये न दिल्याच्या रागातून पतीची हत्या; आता मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:52 AM2021-05-24T10:52:13+5:302021-05-24T10:52:52+5:30

एकावर गुन्हा दाखल, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना

Murder of husband out of anger for not paying Rs 20, now who will take care of children? Says Wife | २० रुपये न दिल्याच्या रागातून पतीची हत्या; आता मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो 

२० रुपये न दिल्याच्या रागातून पतीची हत्या; आता मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो 

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : २० रुपये दिले नसल्याच्या रागातून जयजनता कॉलनीत राहणाऱ्या अनिल आहुजा यांची साहिल मैराळे याने रविवारी रात्री साडे दहा वाजता घरासमोर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ जयजनता कॉलनीत अनिल आहुजा हे आपल्या कुटुंबासह राहत होते. शुक्रवारी अनिल आहुजा हे मित्र रवी बोनेजा यांच्यासह गप्पा मारीत असतांना तेथे परिसरातील साहिल मैराळे येऊन त्याने दोघांकडे २० रुपयांची मागणी केली. त्यांनी २० रुपये न दिल्याने, साहिल याने शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. अनिल व रवी यांनी झालेला प्रकार मनावर घेतला नाही. रविवारी रात्री साडे दहा वाजता अनिल आहुजा हे घरा समोर सागर नायकर यांच्या सोबत बोलत असतांना साहिल मैराळे तेथे येऊन २० रुपये दिले नसल्याचा राग व्यक्त केला. यावेळी दोघात बोलचाली होऊन झटापट झाली. साहिल मैराळे याने पँटच्या खिशातून चाकू काढून अनिल यांच्यावर सपासप वार करून पळून गेला. गंभीर जखमी झालेला अनिल आहुजा रक्ताच्या थारोळ्यात पडूनत्यांचा जागीच मृत्यू झाला.

 रक्ताच्या थारोळ्यात निचपत पडलेल्या अनिल आहुजा यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अनिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस साहिल मैराळे यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत असून पोरखे झालेल्या मुलांचा कोण संभाळ करणार?. असा टाहो पत्नीने पोलिसांसमोर फोडला. परिसरात झालेल्या घटनेचा निषेध केला जात असून अश्या नशेखोरांवर पोलीस वेळीच कारवाई का करीत नाही. असा प्रश्न निर्माण केला.

Web Title: Murder of husband out of anger for not paying Rs 20, now who will take care of children? Says Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस