टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 21:19 IST2021-09-03T21:16:18+5:302021-09-03T21:19:16+5:30
Murder Case : पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅटूवरून पटली मृताची ओळख; आरोपी ४८ तासात उल्हासनगर येथून गजाआड
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील तलावात गळा चिरलेला इसमाचा मृतदेह ३० ऑगस्ट रोजी मिळाला. पोलिसांनी टॅटू व चंदू नावावरून खून झालेल्या इसमाचा नाव, पत्ता यांचा शोध घेऊन, दोन आरोपीला अवघ्या ४८ तासात अटक केली. तसेच पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील स्मशानभूमीच्या तलावात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी गळा चिरलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळाला. मृतदेहाची हातावर टॅटू व चंदू असे नाव होते. विठ्ठलवाडी पोलिसांनी मृतदेह उत्तर तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठयून, चौकशीचे सूत्र हळविले. यावेळी नवीमुंबई रबाडे पोलीस ठाण्यात चंद्रकांत शेलार या नावाच्या इसमाची हरवल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांनी मयत चंद्रकांत शेलार यांच्या पत्नी मीना हिच्याशी संपर्क साधला असता, पत्नीने, मृतदेह चंद्रकांत शेलार यांचा असल्याची कबुली दिली. घणसोली नवीमुंबई येथे नाका कामगार असलेल्या मयत चंद्रकांत शेलार यांची क्षुल्लक कारणावरून घणसोली परिसरात राहणाऱ्या साजन कांबळे व डीवाईन तेलेस घोन्सलवीस यांनी खून केल्याचे उघड झाले.
विठ्ठलवाडी पोलिसांनी मयत चंद्रकांत शेलार यांच्या पत्नी मीना शेलार यांच्या तक्रारीवरून साजन कांबळे व डीवाईन घोन्सलवीस यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या ४८ तासात आरोपींना पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेलाल थोरात यांनी दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.