जळगावात पोलीस ठाण्याच्या समोरच खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 00:01 IST2021-07-11T00:00:57+5:302021-07-11T00:01:25+5:30
Murder News: जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच पाण्याच्या टाकीजवळ महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (वय २१, रा.हिराशिवा कॉलनी) याचा चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजता घडली.

जळगावात पोलीस ठाण्याच्या समोरच खून
जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच पाण्याच्या टाकीजवळ महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (वय २१, रा.हिराशिवा कॉलनी) याचा चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजता घडली. बापू संतोष राजपूत (वय ४४, रा.हिराशिवा कॉलनी) याने हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या खुनाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते, परंतु दोघांमध्ये जुना वाद होता.
बापू राजपूत हा एका जणासोबत पाण्याच्या टाकीजवळ बसून दारु पित असताना डेम्या तेथे आला व बापू याच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. डेम्याने केलेल्या हल्ल्यात बापूही जखमी झाला आहे. डेम्याचा मृत्यू झाल्यानंतर बापू स्वत: हून जिल्हा रुग्णालयात आला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेम्या याचा मृतदेह जागेवरुन हलविण्यास कुटुंबियांनी नकार देऊन संशयिताच्या अटकेची मागणी केली होती.