नागपुरात दारूच्या वादात मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 22:21 IST2021-05-05T22:20:19+5:302021-05-05T22:21:30+5:30

Murder on liquor dispute दारू पिताना झालेल्या वादात एका युवकाने आपल्याच मित्राचा खून केला. ही घटना कळमन्यातील गुलशननगर येथे घडली.

Murder of a friend in a liquor dispute in Nagpur | नागपुरात दारूच्या वादात मित्राचा खून

नागपुरात दारूच्या वादात मित्राचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दारू पिताना झालेल्या वादात एका युवकाने आपल्याच मित्राचा खून केला. ही घटना कळमन्यातील गुलशननगर येथे घडली. निरंजन ऊर्फ गोलू अब्रू वर्मा (३०) असे मृताचे नाव आहे, तर गोलू ऊर्फ प्रमोद समालिया राय साहू (२९, रा. गुलशननगर) असे आरोपीचे नाव आहे. मृत निरंजन हा खासगी कंपनीत मजुरी करीत होता, तर आरोपी प्रमोद ॲपे चालवितो. दोघेही शेजारी असल्याने त्यांच्यात मैत्री होती. मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रमोद घरी आला. त्याने निरंजनसोबत कामठी येथून दारूच्या चार बॉटल विकत आणल्या. दुपारी ४ वाजता प्रमोद आपल्या खोलीत निरंजनसोबत दारू पित बसला. एक बॉटल संपल्यावर प्रमोद निरंजनला म्हणाला की. मला बाहेर जायचे आहे, त्यामुळे तू घरी जा. परंतु निरंजनने उर्वरित तिन्ही बॉटल आताच संपवण्याचे सांगत घरी जाण्यास नकार दिला. तो म्हणाला की, मला तुझ्या घरीच आराम करायचा आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापून निरंजने काठी काढली. प्रमोदने त्याची काठी हिसकावली आणि निरंजनवर हल्ला केला. काठी आणि चाकूने वार करून त्याला जखमी केले. यानंतर खोली बंद करून तो निघून गेला. रात्री ८ वाजता निरंजनच्या घरच्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी निरंजनला रुग्णालयात पोहोचवले. परंतु उपचारास उशीर झाल्याने निरंजनचा मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, प्रमोदला अटक केली आहे.

Web Title: Murder of a friend in a liquor dispute in Nagpur