दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 16:55 IST2022-03-20T16:55:13+5:302022-03-20T16:55:38+5:30
Murder Case : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रुपराज उर्फ भाई राजा पाटील याला पोलिसांनी अटक केली.

दारूसाठी पैसे न दिल्याने हत्या; दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
सदानंद नाईक
उल्हासनगर : धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी दारूला पैसे न दिल्याच्या रागातून कुंदनमल सुनगत याची दोघांने लाथाबुक्कीने मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रुपराज उर्फ भाई राजा पाटील याला पोलिसांनीअटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबीघाट येथून जाणाऱ्या निलेश आहेर याला राजा उर्फ भाई राजा पाटील यांने धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी दारूला पैसे मागितले. पैसे न दिल्याने शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी कुंदनमल सुनगत जात होते. त्यांनाही भाई पाटील व बाळा साठे यांनी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्यांनी फरफटत नेत लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाणीत कुंदनमल याचा मृत्यू झाला होता. मात्र सुरवातीला पोलिसांनी दारू पिल्याने मृत्यू झाला असा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता खरा प्रकार उघड झाला. उल्हासनगर पोलिसांनी शनिवारी खुनाचा गुन्हा रुपराज उर्फ भाई राजा पाटील व बाळा साठे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी पोलिसांनी रुपराज उर्फ भाई पाटील याला अटक केली असून फरार बाळा साठे याचा पोलीस शोध घेत आहेत.