घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या; २७ वर्षीय तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:49 IST2019-08-11T21:47:06+5:302019-08-11T21:49:24+5:30
२७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या; २७ वर्षीय तरुणाला अटक
मुंबई - घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. गोवंडी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास २३ वर्षीय समिउल्लाह फारुकीची हत्या झाली होती.
हत्येनंतर अवघ्या तीन तासात मालवणी पोलिसांनी आरोपी झुबेर खानला अटक करण्यात आली. भायखळा भागात राहणारा समिउल्लाह फारुकी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी शिवाजी नगरला आला होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी त्याचा जीव घेतला. समिउल्लाह फारुकीची प्रेयसी ही आधी झुबेरची पत्नी होती. गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. समिउल्लाह तिला भेटायला आला असल्याचं पाहून झुबेर चिडला. घटस्फोटित पत्नीचं प्रेम प्रकरण असल्याचं समजल्याने झुबेरचा तीळपापड झाला. झुबेर, त्याचा भाऊ आणि चौघांनी बेदम मारहाण करुन आणि सुरीने भोसकलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र, तोपर्यंत समिउल्लाहचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र, मालवणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना अटक केली.