दारू पाण्यावरून वादात खून, तिघेजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 10:05 IST2021-03-14T10:05:17+5:302021-03-14T10:05:41+5:30

Crime News: दारू पिण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपास करून कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले. 

Murder in a dispute over alcohol, three in custody Ichalkaranji | दारू पाण्यावरून वादात खून, तिघेजण ताब्यात

दारू पाण्यावरून वादात खून, तिघेजण ताब्यात

इचलकरंजी : शांतीनगर परिसरात झालेल्या त्या खुनाचा उलगडा करण्यातपोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला यश आले. अजय कांबळे (मूळ रा. मुंबई) असे मृताचे प्राथमिक तपासात समोर आलेले नाव आहे. याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. दारू पिण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपास करून कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले. 

 याप्रकरणी अक्षय रावसाहेब कमतनुरे (वय 22, रा -कृष्णा नगर गल्ली नंबर 4 इचलकरंजी) व शक्ती शहाजी इंगळे (19 रा - शहापूर कामान चौकाजवळ इचलकरंजी) या दोघांसह एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले आहे. 24 फेब्रुवारीला हा खून झाला होता. या तिघा संशयितांनी माणगाव येथून अजयला दारू पिण्यासाठी सोबत घेतले होते. पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या सूचनेनुसार मोसिन पठाण, सुनील पाटील, सुहास शिंदे यांनी मध्यरात्री ही कारवाई केली.

Web Title: Murder in a dispute over alcohol, three in custody Ichalkaranji