शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जन्मदात्या आईनेच केला मुलीचा डोक्यात दगड घालुन खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 2:15 PM

युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.

बारामती । दि. १४ ( प्रतिनिधी) :जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडली. या घटनेमुळे शहरात खळगळ उडालीआहे.युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता.त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.यावरुन घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने हा खुन केला. ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खुन झालेल्या युवतीचे नाव आहे.मंगळवारी (दि १४) सकाळी हि घटना प्रगतीनगर परीसरातील युवतीच्या घरात घडली. तिचा डोक्यात दगड घालून आई संजीवनी हरीदास बोभाटे हिनं  खून केलाआहे. मुलीचं प्रेम प्रकरण असल्यानं खून आई संजीवनी हिने दिली आहे.खूनानंतर आई संजीवनी बोभाटे झाली स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली.

ऋतूजाहिचे वडील डोलेर्वाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई पदावर  कार्यरत आहेत. आज सकाळी ते बँकेत कामावर होते. घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशीबोलताना सांगितले की, ऋतूजा हिने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता.त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई वडीलांनी मुलीला नांदविण्यास नेण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीबरोबर चर्चा करुन सामोपचार घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा तिला नांदवत नसल्याने  ऋतूजा घरी किरकिर करीत असे,यातुन तिचा आईशी देखील वाद होत असे.घरगुती कारणावरुन वाद होत असत. आज सकाळी देखील घरगुती कारणावरुन असाच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.———————————फोटो ओळी : बारामती शहरातील प्रगतीनगर येथे याच घरात ही घटना घडली.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनWomenमहिला