जन्मदात्या आईनेच केला मुलीचा डोक्यात दगड घालुन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:18 IST2019-05-14T14:15:58+5:302019-05-14T14:18:41+5:30
युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.

जन्मदात्या आईनेच केला मुलीचा डोक्यात दगड घालुन खून
बारामती । दि. १४ ( प्रतिनिधी) :जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडली. या घटनेमुळे शहरात खळगळ उडालीआहे.युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता.त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.यावरुन घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने हा खुन केला.
ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खुन झालेल्या युवतीचे नाव आहे.मंगळवारी (दि १४) सकाळी हि घटना प्रगतीनगर परीसरातील युवतीच्या घरात घडली. तिचा डोक्यात दगड घालून आई संजीवनी हरीदास बोभाटे हिनं खून केलाआहे. मुलीचं प्रेम प्रकरण असल्यानं खून आई संजीवनी हिने दिली आहे.खूनानंतर आई संजीवनी बोभाटे झाली स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली.
हिचे वडील डोलेर्वाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. आज सकाळी ते बँकेत कामावर होते. घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घरी धाव घेतली.याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशीबोलताना सांगितले की, ऋतूजा हिने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता.त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई वडीलांनी मुलीला नांदविण्यास नेण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीबरोबर चर्चा करुन सामोपचार घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा तिला नांदवत नसल्याने ऋतूजा घरी किरकिर करीत असे,यातुन तिचा आईशी देखील वाद होत असे.घरगुती कारणावरुन वाद होत असत. आज सकाळी देखील घरगुती कारणावरुन असाच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.
———————————
फोटो ओळी : बारामती शहरातील प्रगतीनगर येथे याच घरात ही घटना घडली.