कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:48 IST2020-05-18T11:34:40+5:302020-05-18T11:48:26+5:30

तडीपारीचा भंग करुन आला होता वाकडमध्ये, दारूच्या नशेत झाला वाद दोस्ताने केले वार

Murder of criminal Mahakali's brother in wakad area | कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार

कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा वाकड परिसरात खून; मित्रानेच केले वार

ठळक मुद्देमनोज ऊर्फ डिंगर्‍यावर ९ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद

पुणे :  पिंपरी चिंचवडमधील कुख्यात गुंड महाकालीच्या भावाच्या लाकडी दांडक्याने वार करुन निर्घृणपणे खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनोज ऊर्फ डिंगर्‍या ढकोलिया असे या गुंडाचे नाव आहे. वाकड परिसरातील पुनावळे येथील लंडन पुलाखाली रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. 
कुख्यात गुंड महाकाली ऊर्फ राकेश ढकोलिया याचा २०१० मध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता. त्यानंतर महाकाली टोळीचा कारभार मनोज पाहू लागला होता. मनोज ऊर्फ डिंगर्‍यावर ९ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता. 
मनोज आणि आदम ऊर्फ गोट्या खान हे दोघे रविवारी रात्री दारु पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते. दारु पित असताना त्यांच्यात भांडणे झाली. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगर्‍याच्या डोक्यात मारहाण केली. त्यात डिंगर्‍या गंभीर जखमी झाला. त्यानंतर आदम तेथून पळून गेला. याची माहिती वाकडपोलिसांना मिळल्यावर ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी डिंगर्‍याला त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी आदम खान याला ताब्यात घेतले आहे. आदम खान याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Murder of criminal Mahakali's brother in wakad area