शरीरसुखाला नकार दिल्याने तीक्ष्ण हत्याराने भावजयीचा खून; पुरंदर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 12:21 IST2020-09-23T12:21:26+5:302020-09-23T12:21:52+5:30
आरोपी हा भावजयीकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असे.

शरीरसुखाला नकार दिल्याने तीक्ष्ण हत्याराने भावजयीचा खून; पुरंदर तालुक्यातील घटना
जेजुरी: वारंवार शरीरसुखाची मागणी करूनही भावजय तयार होत नसल्याने दिराने तिच्यावर सुरीने प्राणघातक वार करून खून केल्याची घटना रिसे (ता. पुरंदर) येथे घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी दीर मुबारक कादर सय्यद हा फरार झाला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसे येथील आरोपी मुबारक कादर सय्यद हा आपली भावजय शबीरा जैन्नुदिन सय्यद ( वय ४५ ) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असे. मात्र ती तयार होत नसल्याने आरोपीने काल (दि.२१ ) रात्री जेवणानंतर घराचे बाहेर भांडी घासत असताना तिला पुन्हा अशी मागणी केली. तिने नकार दिल्याने आरोपीने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून भावजयीचा हातातील सुरीने तिच्या शरीरावर सपासप वार करून तिचा खून केला. घरातील लोकांनी आरडाओरडा केला असता आरोपी पसार झाला.
या खूनप्रकरणी फिर्याद मयत महिलेच्या मुलगी हसीना नासीर मुलानी हिने जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेण्यास दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे