उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 07:54 AM2020-05-24T07:54:46+5:302020-05-24T07:55:15+5:30

महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला.

Murder of Balchapasvi Shivacharya Nirvanrudra Pashupatinath Maharaj in Umri taluka | उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार

उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार

googlenewsNext

उमरी ( जि.नांदेड ) :  तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.

महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला.  ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.

नागठाणा बु. येथील मठामध्ये अन्य एकाचा मृतदेह सापडला

नागठाणा बु.ता. उमरी  येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते.  घटनास्थळी उमरी  पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे.

 

Web Title: Murder of Balchapasvi Shivacharya Nirvanrudra Pashupatinath Maharaj in Umri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.