फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:10 IST2019-08-06T21:07:28+5:302019-08-06T21:10:42+5:30

महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Murder of 48 years man; Five people were in custody | फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात

फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात

ठळक मुद्दे फिरस्त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी महात्मा फुले चौक पोलिसांना आढळुन आला. याप्रकरणी पुढिल तपास महात्मा फुले चौक पोलीस करित आहेत.

कल्याण -  एका ४८ वर्षीय फिरस्त्याचे हातपाय बांधून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याची हत्या करणा-या पाच जणांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पश्चिमेतील मुरबाडकर गेस्ट हाऊस परिसरात जोंगोल लोहरा (४८, मुळ रा. झारखंड) या फिरस्त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी महात्मा फुले चौक पोलिसांना आढळुन आला. लोहरा याचे हातपाय दोरीने बांधुन त्याला लाकडी दांडक्यानी तसेच कोणत्यातरी हत्याराने डोक्यावर मारहाण करत त्याला जीवे ठार मारत त्याचा मृतदेह सुधांशु चेंबर येथील एका गल्लीजवळ टाकण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे संदेश जाधव, नवनाथ राठोड, मंगल उर्फ मंगेश हमाल, अनिस शेख, नुरआलम उर्फ राजू झिप-या आणि पोपट मामा यांनी मिळुन लोहरा याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी संदेश, नवनाथ, अनिस, राजू आणि पोपट यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर मंगलचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पुढिल तपास महात्मा फुले चौक पोलीस करित आहेत.

Web Title: Murder of 48 years man; Five people were in custody