-mumbai-terror-attack-mastermind-hafiz-saeed's relative arrested for hate speech | वादग्रस्त विधान करणाऱ्या हाफिज सईदच्या नातेवाईकास अटक 
वादग्रस्त विधान करणाऱ्या हाफिज सईदच्या नातेवाईकास अटक 

ठळक मुद्दे मक्कीला कायद्याच्या अधिनियमाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारतर्फे एफआयएफवर मार्च महिन्यात बंदी घातली आहे.  2010 मध्ये भारतविरोधी वक्तव्य देखील त्याने केली होती.

लाहोर - मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज साईदचा नातेवाईक अब्दुल रेहमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. बंदी असलेल्या जमात- उद- दावाचा नेता हफीज सईदचा जवळचा नातेवाईकाला वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जिओ न्यूजच्या गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय प्रकरण पाहणाऱ्या शाखेचे प्रमुख आणि याची चॅरिटी संस्था फलाह - ए- इंसानियत फाउंडेशनचे (एफआयएफ) प्रभारी अब्दुल रेहमान मक्का असून या प्रतिबंधित संघटनेच्याविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाई अंतर्गत मक्कीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पंजाब पोलिसांनी सांगितले की, मक्कीला कायद्याच्या अधिनियमाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारतर्फे एफआयएफवर मार्च महिन्यात बंदी घातली आहे. या बंदी घातलेल्या संघटनेचा मक्की हा लष्कर - ए - तोयबाचा चेहरा आहे. ही बंदी असलेली संघटना मुंबईत झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असून या हल्ल्यात १६६ जण मृत्युमुखी पडले होते. जमात - उद - दावा या संघटनेवर मक्कीचा खास प्रभाव असून मक्कीने भारतविरूद्ध विष कळवणारा म्हणून देखील मक्की ओळखला जातो.  2010 मध्ये भारतविरोधी वक्तव्य देखील त्याने केली होती. 

Web Title: -mumbai-terror-attack-mastermind-hafiz-saeed's relative arrested for hate speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.