शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

"मला लग्न करायचंय, जामीन द्या", रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीची अजब मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:02 IST

Rohit Shetty : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रितिक यादव याने आता अजब मागणी केली आहे.

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रितिक यादव याने आता अजब मागणी केली आहे. "मला लग्न करायचंय, जामीन द्या..." असं म्हटलं आहे. रितिकने स्वतःच्या लग्नासाठी तात्पुरता जामीन मिळण्यासाठी मकोका अंतर्गत सुनावणी करणारे न्या. सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात अर्ज केला.

१ फेब्रुवारी रोजी जुहू येथील शेट्टी यांच्या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक गोळी इमारतीतील जिमच्या काचेला लागली होती. या प्रकरणात अटक केलेले १२ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी यादव हा १४ फेब्रुवारीरोजी हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी एक आहे. 

११ मार्च रोजी रितिक यादवचं लग्न मूळगावी आग्रा येथे होणार आहे. त्यामुळे त्याने केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गोळीबाराचं कृत्य लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या शुभम लोणकर याने केल्याचे सांगितलं जातं. त्याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही जबाबदारी स्वीकारली आहे. 

लोणकर हा राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात तसेच अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही फरार आरोपी आहे. या आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचं समोर आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "I want to marry, grant bail," shooter's bizarre request.

Web Summary : Ritik Yadav, arrested in the Rohit Shetty shooting case, seeks bail to get married. He applied for temporary bail in MCOCA court, with his wedding planned for March 11 in Agra. The shooting is linked to the Lawrence Bishnoi gang.
टॅग्स :Rohit Shettyरोहित शेट्टीMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयmarriageलग्न