ऑनलाइन पीयूसीबाबत मुंबई पोलीसच अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:34 IST2019-11-04T13:31:21+5:302019-11-04T13:34:17+5:30
ऑफलाइन पीयूसी वैध?

ऑनलाइन पीयूसीबाबत मुंबई पोलीसच अनभिज्ञ
मुंबई - केंद्र सरकारने ऑनलाइन पीयूसीची सक्ती केली आहे. मात्र, याबाबत मुंबई पोलीसच अनभिज्ञ असल्याचे समोर आहे. एका वाहन चालकाने ऑफलाइन पीयूसीचा फोटो ट्वीट करून ही वैध आहे का, असे मुंबई पोलिसांना विचारले़ त्यावर पोलिसांनी वैध असल्याचे सांगितले. याबाबत आरटीओचे प्रवक्ते अभय देशपांडे यांना विचारले असता, ती पीयूसी वैध नसल्याचे सांगितले.
प्रवीण डे यांनी ऐरोली चेक नाक्याजवळ वाहनाची पीयूसी काढली आहे. त्याबाबत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात जाऊन ही वैध आहे का, अशी विचारणा केली, परंतु त्यांनी माहित नाही, परंतु पीयूसी व्हॅनने जर ही पीयूसी केली असेल, तर ती वैध असेल, असे सांगितले. हे वैध आहे का अशी विचारणा मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर केली. त्यावर पोलिसांनी वैध असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने वाहनांची पीयूसी(वायुप्रदूषण तपासणी) ऑनलाइन करण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार, राज्यात आरटीओने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. एखाद्या वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यानंतरच वाहन रस्त्यावर आणता येते, अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते.