Video : मुंबई पोलिसांचा हिसका; ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी 725 तळीरामांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:10 IST2019-03-21T20:08:26+5:302019-03-21T20:10:47+5:30
सणाच्या निमित्ताने रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखवला आहे.

Video : मुंबई पोलिसांचा हिसका; ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी 725 तळीरामांवर कारवाई
मुंबई - आज धुळवड सणाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीसांचे पथक ठिकठिकाणी सज्ज होते. सणाच्या निमित्ताने रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांनी हिसका दाखवला आहे. मुंबई पोलिसांसह त्याच्या वाहतूक विभागाने देखील विशेष मोहीम राबवून नाकाबंदी ठिकाणी आज रात्री दहा वाजेपर्यंत 725 तळीरामांवर ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने रात्री दहा वाजेपर्यंत रॅश ड्राइविंग प्रकरणी 166, जलद गतीने वाहन चालविल्याप्रकरणी 430, ट्रिपल सीटप्रकरणी 789 आणि हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या 4738 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत मोठी कारवाई केली आहे.