Mumbai Police raided and seized 2 kg of charas, arrested both | मुंबई पोलिसांनी धाड टाकून दोन किलो चरस केला जप्त, दोघांना अटक

मुंबई पोलिसांनी धाड टाकून दोन किलो चरस केला जप्त, दोघांना अटक

ठळक मुद्देभाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी छापा टाकून दोन किलो चरससह दोघांना अटक केली आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .

मीरारोड -  मुंबईपोलिसांच्याअमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुलाजवळ मंगळवारी छापा टाकून दोन किलो चरससह दोघांना अटक केली आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थांच्या सेवन आणि तस्करीचा प्रकार समोर आल्याने केंद्राच्या अमली पदार्थ विरोधी पथका कडून कारवाया सुरु आहेत . त्यातच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी भाईंदर पूर्वेला पालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ सापळा रचून अविनाश सिंह (२४) रा. जगदीप अपार्टमेंट, नालासोपारा व श्रवण गुप्ता (३८) रा. गुरुनानक चाळ, कैलाश दर्शन जवळ, नालासोपारा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ किलो ४० ग्राम चरस जप्त करण्यात आली आहे.  या चरसचा मुख्य पुरवठादार भाईंदर पूर्वेला राहणारा  बळीराम उर्फ बल्ली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Web Title: Mumbai Police raided and seized 2 kg of charas, arrested both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.