मुंबई पोलीस दलात आता ३८ घोडेस्वार पोलिसांचा समावेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 21:01 IST2019-02-28T20:58:46+5:302019-02-28T21:01:14+5:30
गृह विभागाने आज त्यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे.

मुंबई पोलीस दलात आता ३८ घोडेस्वार पोलिसांचा समावेश करणार
मुंबई - मुंबई पोलीस दलात आता ३८ घोडेस्वार पोलीसांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईच्या सुरक्षेसाठी हे घोडेस्वार पोलीस (मांउटेंड कॅाप्स) उपलब्ध होणार आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळातून नविन घटक निर्णय करण्यात आला आहे. गृह विभागाने आज त्यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे.
मुंबईतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी ३० आश्वासह मांउटेंड कॅाप्स या नविन घटकाच्या निर्मितीबाबत प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानुसार आता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या रस्त्यांवर घोडेस्वार पोलीस दिसणार आहेत. माउटेंड कॅाप्स घटकात १ पोलीस निरिक्षक,१ सहायक पोलीस उपनिरिक्षक, ४ पोलीस हवालदार, व ३२ पोलीस शिपाई असे एकूण ३८ अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. यासाठी एकूण ८२ लाख ४६ हजार आवर्ती तर १ कोटी १६ लाख ८३ हजार खर्चास मान्यता देण्यात आली आहे. वरील कर्मचारी नायगाव विभागातील आस्थापनेतून मंजूर मनुष्यबळातून वर्ग करण्यात येणार असून हे घोडेस्वार पोलीस पोलीस आयुक्त, जलद प्रतिसाद पथक यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे.