सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:27 PM2020-08-19T14:27:10+5:302020-08-19T14:28:33+5:30

Sushant Singh Rajput Case SC Order CBI Investigation : मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील न्यायालयानं केल्या आहेत.

Mumbai Police commissioner responds to Supreme Court verdict in Sushant case | सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

सुशांत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली प्रतिक्रिया 

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाची आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करुन पुढे काय करायचे त्याबाबत निर्णय घेऊ.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे व तपासात सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानेमुंबई पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाची आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करुन पुढे काय करायचे त्याबाबत निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांशी बोलणं झालं आहे”
 


पाटणा येथे दाखल झालेला गुन्हा सर्वसमावेशक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र, न्यायालयाने त्यासाठी नकार दिला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर पार्थ पवारांनी दोन शब्दात आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या. सत्यमेव जयते इतकीच प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर दिली त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबीयातील मतभेदावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली. सुशांत प्रकरणात पार्थने सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपने देखील सुशांत प्रकरणी सीबीआय तपासासाठी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

दाऊदच्या हस्तकाने केला मोठा खुलासा, नेपाळमधून भारतात पाठवत होता नकली सोनं अन् नोटा 

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, युनिसेक्स स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय अन् आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

Read in English

Web Title: Mumbai Police commissioner responds to Supreme Court verdict in Sushant case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.