शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना पुन्हा मिळू शकते मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:50 PM

बर्वे यांना कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपला होता.

ठळक मुद्देआता पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.   आता ३० नोव्हेंबरला बर्वे यांचा वाढीव कार्यकाळ संपत आहे. ३१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन झाली तर मात्र मुंबईत नवे पोलीस आयुक्त रुजू होई शकतात.

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना पुन्हा ३ महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते. कारण महाराष्ट्रात सध्यातरी तरी राष्ट्रपती राजवट लागू झालेली असून या काळात राष्टपतींच्या देखरेखीखाली राज्याचा कारोभार सांभाळला जाईल. त्याचप्रमाणे या काळात कोणतीही बदली किंवा नवीन नेमणूक केली जात नसल्याने मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना मुंबीएच्या सुरक्षेची धुरा सांभाळण्यासाठी आणखी ३ महिने मुदत वाढ मिळू शकते. मात्र, ३१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन झाली तर मात्र मुंबईत नवे पोलीस आयुक्त रुजू होई शकतात. बर्वे यांना कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपला होता. मात्र, त्यांना ३ महिने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता ३० नोव्हेंबरला बर्वे यांचा वाढीव कार्यकाळ संपत आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.  ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुका, अयोध्या निकाल, भारताने काश्मीरमधील कलम ३७० हटविले या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ऑगस्टमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. अत्यंत कडक शिस्तीचे, मृदू स्वभावाचे आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांची ओळख आहे. माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची निवड करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनी बर्वे हे सेवा निवृत्त होणार होते. अत्यंत कमी काळात बर्वे यांनी आयुक्त पदाची धूरा अत्यंत चांगल्यारित्या संभाळली. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे हे निवृत्त होणार असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्यासाठी अनेक दिग्गज आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र, बर्वे यांना ३० ऑगस्टला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना संजय बर्वे यांच्या खांद्यावर पुन्हा ३ महिने मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Sanjay Barveसंजय बर्वेMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्तPresident Ruleराष्ट्रपती राजवट