मैत्रिणीवर मित्राचा जीवघेणा हल्ला, बोरिवली नॅशनल पार्कातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:06 IST2019-01-30T15:51:10+5:302019-01-30T16:06:33+5:30
बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकून वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मैत्रिणीवर मित्राचा जीवघेणा हल्ला, बोरिवली नॅशनल पार्कातील घटना
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - बोरिवली नॅशनल पार्क परिसरात एका तरुणीवर मित्राकडूनच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित तरुणी मित्रासोबत नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेली होती. मात्र या दोघांमध्ये काही कारणांवरुन वादावादी झाली. यानंतर रागाच्या भरात त्यानं मैत्रिणीवर धारदार चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मैत्रिणीवर हल्ला करुन त्याने स्वतःवरदेखील चाकूने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना संपर्क साधत घडला प्रकार सांगितला. यानंतर कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल केले. दोघांवरही उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण, तरुणाने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला का केला?,याचा शोध पोलीस घेताहेत.