शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Aryan Khan Drugs Case: वकील 'भांडत राहिले' अन् आर्यन खानला वेळ कमी पडला; धुरंदर सुट्ट्या कसे विसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 7:51 PM

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: दसरा आणि जोडून आलेल्या सुट्या. कोर्टाची बंद होण्याची वेळ. दोन दिवस चाललेला युक्तीवाद, आर्यन खानला वेळ कमी होता पण एवढे मोठे वकील विसरले की सरकारी वकिलांनी त्यांना गुंडाळले.

ड्रग्सच्या जाळ्यात अडकलेल्या आर्यन खानच्या (Aryan Khan) अडचणी वाढत चालल्या आहेत. त्याच्या जामिनासाठी '11 मुलखोंकी पुलीस' वाला शाहरुख खान जंग जंग पछाडत आहे. परंतू आर्यन खान काही बाहेर येत नाहीय. शाहरुखने एकसोएक वकील दिले आहेत. सलमानने त्याचा विश्वासू वकील शाहरुखच्या मदतीला दिला आहे. तरी सरकारी वकील आणि एनसीबी (NCB) त्यांच्यावर भारी पडली आहे.

काल आणि आज असे दोन दिवस सेशन कोर्टात शाहरुखच्या वकिलांनी आर्यनला सोडविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस दोन्ही पक्षाचे वकील भांडत राहिले परंतू आर्यन खानला आणखी पाच दिवस तुरुंगात रहावे लागणार आहे. कधी किस्पटासारखा कचरा न पाहिलेल्या आर्यन खानला तुरुंगात रहावे लागत आहे. दोन्ही बाजुच्या वकीलांनी युक्तीवाद एवढा वेळ केला की अखेर कोर्टाकडे निकाल देण्यासाठी विचार करण्यास वेळ उरला नाही. यामुळे दसरा, शनिवार, रविवारच्या सुट्या असल्याने कोर्टाने निकाल थेट 20 तारखेलाच देण्याचे जाहीर केले. 

आज काय घडले...एनसीबीने आर्यन खानवर ड्रग संबंधी चॅट, आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांशी संबंध आदी गंभीर आरोप केले. तसेच त्याच्याविरोधात ठोस पुरावे आहेत असे देखील न्यायालयात सांगितले आहे. आरोपींपैकी एकाला जरी जामिन मिळाला तरी देखील या प्रकरणातील पुरावे, साक्षीदारांसोबत छेडछाड होऊ शकते. एनसीबीने परदेशात लिंक लागल्याने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये कोणत्यातरी मोठ्या कटकारस्थानाचा संशय देखील व्यक्त केला आहे. 

आर्यन खानच्या वकिलांचा युक्तीवाद..आर्यन खानच्या वकिलांनी एनसीबीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले. ज्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देण्यात आला आहे, ते एक रचलेले षडयंत्र आहे. आजच्या मुलांची भाषा आणि इंग्रजी खूप वेगळी आहे. त्यांचे बोलणे .यामुळे संशयास्पद वाटू शकते, असे वकील देसाई म्हणाले. आर्यनचे चॅट खूप जुने होते. तो काही काळ परदेशात होता. तिथे या गोष्टी कायदेशीर मान्यतेच्या आहेत. एनसीबी त्यांची चौकशी सुरु ठेवू शकते. परंतू त्यांना परदेशातील लिंक शोधायच्या आहेत म्हणून आर्यनला तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे ते म्हणाले. आर्यनला आता कैद्यांमध्ये रहावे लागणारआर्यन खानचा क्वारंटाईन संपला आहे. यामुळे त्याला आता अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि नंतर ऑर्थर रोड तुरुंगात आहे. 

संबंधीत बातम्या...

आर्यन खान एवढ्या वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज घेतोय; NCB ने पुरावे दिलेआर्यन खानच्या जामिनावर २० ऑक्टोबरला फैसला, कोर्टाने राखून ठेवला निर्णय 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCourtन्यायालयMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी