विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षकाला तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 10:55 IST2021-08-25T10:55:08+5:302021-08-25T10:55:47+5:30

Crime News : दहा हजार दंडांपैकी आठ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले.

mumbai court sends arabic teacher to 1 yr jail for showing porn to 5 yr old | विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षकाला तुरुंगवासाची शिक्षा

विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षकाला तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : मुंबईच्या स्पेशल कोर्टाच्या पोक्सो ऍक्ट अंतर्गत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 30 वर्षांच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्याला पॉर्न दाखवून मास्टरबेट केल्याचा आरोपांतर्गंत 1 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2016 रोजी या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील कंटेट दाखवला होता. त्यावेळी त्या विद्यार्थीनीचे वय 5 वर्षे होते. या मुलीला काका तिला सायंकाळी 5.30 वाजता अरबी शिकण्यासाठी शिक्षकाकडे सोडून गेला होता. 

संध्याकाळी मुलीला घेऊन तिचे वडील घरी गेले. घरी गेल्यावर आईने विचारले तुला आज काय शिकवलं?. तेव्हा मुलीने जे सांगितलं ते ऐकून आईला धक्काच बसला. शिक्षकाने तिला अश्लील फोटो दाखवले आणि त्यांनी काही तरी केले, असे मुलीने आईला सांगितले. 

हा सगळा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षकाचा फोन जप्त केला. चार्जशीट दाखल झाल्यानंतर शिक्षकाने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. तसेच, मुलीचे पालक फी भरत नसल्यामुळे मला फसवण्याचा कट करत आहेत, असा आरोपही केला. 

मुलीने कोर्टात सांगितले की, घटनेच्या वेळी तिच्या बेंचसमोर आणखी एक विद्यार्थी  बसला होता. आरोपीने त्याला चुकीचे काम करण्यास सांगितले होते. विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की, मुलीला दाखवलेला व्हिडओ आणि फोटो अश्लील आहेत. मुलीचे पालक त्याला का फसवतील याचे आरोपीने वैध कारण दिलेले नाही. ते केवळ फीसाठी हे करणार नाहीत.

यानंतर, मुलीच्या पालकांनी फी जमा केली नाही, याचा कोणताही पुरावा नाही. आरोपीने मुलीच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबावही केला नाही. कोणतेही पालक आपल्या मुलाचे भविष्य फीसाठी पणाला लावणार नाहीत. अशा घटनांचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो, असे न्यायाधीश भारती काळे यांनी म्हटले. त्यानंतर न्यायाधीशांनी शिक्षकाला एक वर्ष तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दहा हजार दंडांपैकी आठ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: mumbai court sends arabic teacher to 1 yr jail for showing porn to 5 yr old