Mukesh Ambani: "Mansukh Hiren will not commit suicide, he is a good swimmer" says his son | Mukesh Ambani bomb scare: “मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा

Mukesh Ambani bomb scare: “मनसुख हिरण आत्महत्या करणार नाहीत, ते चांगले स्विमर”; मुलाचा धक्कादायक दावा

ठळक मुद्देमाझे वडील मनसुख हिरण हे चांगले स्विमर होते, ते आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हतेमनसुख हिरण यांचा मृतदेह सापडल्याने हे प्रकरण विधिमंडळातही गाजलंहे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत?

 मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनने भरलेली स्कोर्पिओ गाडी आढळली होती, या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर जवळ सापडला आहे, मात्र यावरून आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. प्राथमिक माहितीनुसार मनसुख हिरण यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे, यातच माझी मानसिकस्थिती ठीक नाही असं पत्रही त्यांनी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं समोर आलं आहे.( Mansukh Hiren, whose car was found outside Mukesh Ambani's residence in Mumbai, found dead)

आता या प्रकरणात मनसुख हिरण यांच्या मुलाने धक्कादायक दावा केला आहे, माझे वडील मनसुख हिरेन हे चांगले स्विमर होते, ते आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केलीय असं सांगितलं जातं ते साफ खोटं आहे, यामागे घातपात असल्याचा संशयही हिरेन यांच्या मुलाने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात काय घडलं हे शोधणं पोलिसांसमोर आव्हानात्मक बनलं आहे.

“तपास अधिकारी अन् स्कोर्पिओ गाडी मालकाचं फोनवरून संभाषण”; मुकेश अंबानी प्रकरणाला वेगळंच वळण

अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक हे प्रकरण

मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडल्याने हे प्रकरण विधिमंडळातही गाजलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरून तपास अधिकारी सचिन वाझेंबद्दल शंका उपस्थित केली, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात यावं. (Devendra Fadnavis Demands Handling over Probe into Car Found Near Mukesh Ambani's House to NIA) तसेच यापुढे जात देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, जून आणि जुलै २०२० मध्ये याच गाडी मालकासोबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं संभाषण झाल्याचा सीडीआर आहे, गाडी मालक आणि सचिन वाझे हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते का? असा प्रश्न उपस्थित त्यांनी विचारला.  

त्याचसोबत गाडी मालक ठाण्याचा, तपास अधिकारी ठाण्याचा, गाडी चोरी होऊन ठाण्याहूनच घटनास्थळी कशी आली? सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून नेमलं, एका टेलिग्राम चॅनेलवर जैश उल ए हिंद या संघटनेच्या नावानं ही गाडी आम्ही ठेवलीय असं पत्रक व्हायरल झालं, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी या संघटनेने स्पष्टीकरण दिलं, हे सगळं संशयास्पद आहे  गाडीचे मालक मनसुख हिरण यांची गाडी चोरीला गेली, त्यानंतर ते क्रॉफेड मार्केटला आले, तेथे ते कोणाला भेटले? गाडी जेव्हा स्पॉट झाली तेव्हा स्थानिक पोलिसांआधीच सचिन वाझे तेथे कसे पोहचले? त्यांना चिठ्ठी कशी मिळाली? अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे. त्याचसोबत स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरण हे या प्रकरणाचे सर्वात मोठा दुवा होता, त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी असं सांगितले होते, कारण तेच या घटनेचे मुख्य धागेदोरे होते. मात्र आता त्यांचाच मृतदेह सापडला आहे, आहे असं फडणवीस म्हणाले.

अर्णबला अटक केली त्याचा राग का?

अर्णब गोस्वामींना अटक केली त्याचा सचिन वाझेंवर राग आहे का? सचिन वाझेंनी ७ दिवस अन्वय नाईक केसमध्ये त्यांना आत टाकलं होतं, मनसुख हिरेन प्रकरणात जी काही माहिती असेल महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा रेती बंदर येथे सापडली, त्यांच्या अंगावर कोणतंही चिन्ह नाही, ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत असं सांगत गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.  

Web Title: Mukesh Ambani: "Mansukh Hiren will not commit suicide, he is a good swimmer" says his son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.