चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए'
By रवींद्र देशमुख | Updated: March 16, 2023 15:47 IST2023-03-16T15:47:23+5:302023-03-16T15:47:39+5:30
घातक शस्त्रानिशी फिरून चोरी, खंडणी मागणे, धमकी देणे, हल्ला करणे, दरोडा घालण्याची पुर्वतयारी करणे यासारखे गंभीर गुन्हयांचा समावेश होता.

चौका-चौकात दहशत पसरून लुटणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगारास 'एमपीडीए'
सोलापूर: सोलापुरातील प्रमुख चौकात दहशत पसरून सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारास शहर पोलिसांनी 'एमपीडीए' नुसार स्थानबद्ध केले आहे. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या या आरोपीचे नाव आकाश अनिल मुदगल आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरुट चौक, सिध्दार्थ चौक, बापुजी नगर, लष्कर, मौलाली चौक, स्लॅटर हाऊस, अलकुंटे चौक, जवहार नगर, कुंभार गल्ली, संत तुकाराम चौक, न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, तेलंगी पाच्छा पेठ, कुचन नगर, खड्डा, गुरुनानक चौक, एम्प्लॉयमेंट चौक, सात रस्ता, जगदंब चौक, नळ बाजार, विको प्रोसेस चौक, साईबाबा चौक या परिसरात 28 वर्षीय आकाश हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत होता. या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून चोरी, खंडणी मागणे, धमकी देणे, हल्ला करणे, दरोडा घालण्याची पुर्वतयारी करणे यासारखे गंभीर गुन्हयांचा समावेश होता.