पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 12:23 IST2021-07-17T12:22:35+5:302021-07-17T12:23:43+5:30

चौकशीदरम्यान सपना यादवने पोलिसांना सांगितलं की, १० वर्षाआधी तिचं रामनिवाससोबत लग्न झालं होतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं होतं.

MP : Woman murdered drunken husband with a shovel | पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा

पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राजगड जिल्ह्यात एका महिलेने दारोड्या पतीची फावड्याने कापून हत्या (Wife Murder Husband) केली आणि घर मालकाला सूचना दिली की, पती बेशुद्ध पडला असून त्याचं रक्त वाहत आहे. घरमालकाच्या सूचनेवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मुलींची चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की, 'आई बाबाला मारलं'.

रमाकांत शर्मा यांचं न्यू कॉलनीमध्ये घर आहे. या घरात रामनिवास आपली पत्नी सपना आणि दोन मुलींसोबत राहत होता. रमाकांतने सांगितलं की, त्याला सपनाचा फोन आला होता. तिने रडत सांगितलं होतं की रामनिवासचं खूप रक्त वाहत आहे आणि तो रूममध्ये बेशुद्ध पडला आहे. 

ही माहिती मिळताच रमाकांत शर्मा भाडेकरून सपना यादवच्या घरी गेला. तिथे जे दिसलं ते पाहून तो हैराण झाला. घराच्या मागच्या रूममध्ये रामनिवास यादव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जवळच एक फावडंही होतं. रमाकांतने याची सूचना पोलिसांना दिली. (हे पण वाचा : क्रूरतेचा कळस! तब्बल 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; पायावरील मजकूर पाहून पोलीसही हैराण)

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आजूबाजूला चौकशी केली. त्यानंतर रामनिवासच्या दोन मुलींनाही पोलिसांनी विचारपूस केली. मुलींनी सांगितलं की, आई बाबाना फावड्याने मारलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली.

चौकशीदरम्यान सपना यादवने पोलिसांना सांगितलं की, १० वर्षाआधी तिचं रामनिवाससोबत लग्न झालं होतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर रामनिवासला दारूची लत लागली होती. दारून पिऊन तो रोज भांडण करत होता आणि तिला मारहाण करत होता.

पोलिसांनी सांगितलं की, पतीने मारहाण केल्याने रागावलेल्या पत्नीने त्याला फावड्याने मारलं. त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि छातीवर प्रहार केला. ज्यामुळे तो गंभीर रूपाने जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की,  आरोपी पत्नीला अटक करण्यात आली. तिला आता कोर्टात सादर केलं जाईल. 
 

Web Title: MP : Woman murdered drunken husband with a shovel