धक्कादायक! बहिणीसोबत झाला होता रेप, २ भावांनी सूड म्हणून आरोपीच्या बहिणीवर केला गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:46 IST2021-09-21T13:44:22+5:302021-09-21T13:46:03+5:30

एका अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यांआधी रेप करण्यात आला होता. आता आरोपीच्या १६ वर्षीय बहिणीने पीडितेच्या २ सख्ख्या भावांवर गॅंगरेपचा आरोप करत सर्वानाच धक्का दिलाय.

MP : Two brothers gang raped the minor sister of the accused to revenge Rewa | धक्कादायक! बहिणीसोबत झाला होता रेप, २ भावांनी सूड म्हणून आरोपीच्या बहिणीवर केला गॅंगरेप

धक्कादायक! बहिणीसोबत झाला होता रेप, २ भावांनी सूड म्हणून आरोपीच्या बहिणीवर केला गॅंगरेप

मध्य प्रदेशमध्ये अल्पवयीन बहिणीसोबत झालेल्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दोन सख्ख्या भावांनी मिळून गॅंगरेपसारखं निर्दयी कृत्य केलं. आरोपींच्या अल्पवयीन बहिणीसोबत पीडितेच्या भावाने ७ महिन्यांआधी रेप केला होता. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रीवा जिल्ह्यातील गढ येथे घडली.

एका अल्पवयीन मुलीवर ७ महिन्यांआधी रेप करण्यात आला होता. आता आरोपीच्या १६ वर्षीय बहिणीने पीडितेच्या २ सख्ख्या भावांवर गॅंगरेपचा आरोप करत सर्वानाच धक्का दिलाय. मुलीने तक्रारीत सांगितलं की, घरात घुसून दोन्ही सख्ख्या भावांनी तिच्यासोबत रेप केला आणि जीवे मारण्याची धमकी देत ते फरार झाले. त्यावेळी ती घरात एकटीच  होती. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर भोंदूबाबाचा बलात्कार )

प्राथमिक चौकशीत हा सूड घेण्याच्या भावनेतून करण्यात आलेला रेप मानला जात आहे. ७ महिन्यांआधी एका अल्पवयीन मुलीवर रेपची घटना घडली होती. या प्रकरणाचा आरोपी अजून तुरूंगात आहे. आरोपीच्या अल्पवयीन बहिणीसोबत गॅंगरेप झाला आहे.  आधीच्या रेपच्या घटनेचा सूड घेण्यासाठी पीडितेच्या भावांनी हे कृत्य केलं. पोलीस आऱोपींच्या शोधासाठी जागोजागी छापे मारत आहेत. पण अजून ते हाती आलेले नाहीत.
 

Web Title: MP : Two brothers gang raped the minor sister of the accused to revenge Rewa