महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 19:43 IST2021-07-08T19:39:22+5:302021-07-08T19:43:05+5:30

मंगळवारी सकाळी सिंहवाहिनी मंदिर रेगवामध्ये एक तीन वर्षाचा मुलगा रडत आढळून आला. गावातील लोकांनी पोलिसांनी सूचना दिली आणि..

MP : Three years old child solved his mother murder mystery in Satna | महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य

महिलेला मारून झाडांमध्ये फेकून दिलं, ३ वर्षाच्या मुलाने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील मैहरच्या अमदरामध्ये एका तीन वर्षीय बेवारस मुलाने आपल्या आईच्या हत्येचं रहस्य उघड केलं. पोलिसांनी मृत महिला आणि हरवलेल्या मुलाच्या आधारे तपास केला तर ही खळबळजनक घटना समोर आली.

मंगळवारी सकाळी सिंहवाहिनी मंदिर रेगवामध्ये एक तीन वर्षाचा मुलगा रडत आढळून आला. गावातील लोकांनी पोलिसांनी सूचना दिली आणि पोलीस त्याला घेऊन त्याच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर दूर अंतरावर एका महिलेचा मृतदेह झुडपांमध्ये आढळून आला होता. महिलेचीही ओळख पटली नव्हती. 

अशात सापडलेला मुलगा आणि मृत महिला यांचा संबंध जोडून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस मुलाला घेऊन महिलेच्या मृतदेहाजवळ गेले तर मुलगा आई-आई करत ओरडला. पोलिसांनी चौकशी केली तर त्याने सांगितलं की, वडिलांनी आईची हत्या केली. पण तो ना त्याचं नाव सांगू शकला ना वडिलांचं. (हे पण वाचा : भयंकर! चेटकीण असल्याच्या संशयातून महिलेची हत्या; 6 वर्षीय लेकाने सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार)

घटनास्थळापासून एक किलोमीटर दूर अंतरावर एनएच ३० वर एका कार आणि जीपची टक्कर झाली होती. संशयाच्या आधारावर वाहनांची पाहणी केली तर प्रकरण आणखी चिघळलं. जीपमद्ये महिलेचं तुटलेलं हाड आणि मुलाचे कपडे सापडले. यावरून हे स्पष्ट झालं की, महिला आणि मुलाला याच गाडीतून नेण्यात आलं होतं. महिलेची हत्या करून मुलाला बेवारस सोडून देण्यात आलं.  

अपघात झालेली गाडी कटनी जिल्ह्यातील आहे. मुलाने मृत महिला त्याची आई असल्याचं सांगितल्याने आणि वडिलांनी हत्या केल्याचं सांगितल्याने अंदाज हा लावला गेला की, महिलेची हत्या करून तिला बोलोर कारमधून नेण्यात आलं असेल.
नंतर केवळ १२ तासात हत्येची पूर्ण कहाणी समोर आली. महिलेच्या हातावर लक्ष्मी असं नाव लिहिलं होतं. पोलीस धागेदोरे जुळवत कारच्या मालकापर्यंत पोहोचले. (हे पण वाचा : धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा)

तपासातून समोर आलं की, अखिलेश यादव नावाच्या व्यक्तीचे मृत लक्ष्मीबाई गोडसोबत संबंध होते. गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मी अखिलेशसोबत राहत होती. मात्र, दीड महिन्यांपूर्वी अखिलेशचा विवाह दुसऱ्या महिलेशी झाला. यामुळे लक्ष्मी त्याला त्रास देत होती. याचाच राग धरून अखिलेशने तीन साथीदारांच्या मदतीने लक्ष्मीची हत्या करण्याचा प्लॅन केला. आधी तो फिरायला जाण्याचं कारण देत लक्ष्मी आणि मुलाला घेऊन गेला. 

नंतर महिलेचा दोराने गळा आवळून तिची हत्या केली आणि मुलाला मंदिराजवळ सोडून फरार झाला. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या कारचा अपघात झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मुलाला मुख्य साक्षीदार बनवलं जाईल.
 

Web Title: MP : Three years old child solved his mother murder mystery in Satna