सासूच्या उपचारासाठी गेले होते मुंबईला, परतल्यावर घराची हालत बघून गेले 'कोमात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:35 IST2021-10-14T18:34:39+5:302021-10-14T18:35:23+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, शमशेर आपल्या सासूच्या उपचारासाठी मुंबईला गेला होता. त्याने सांगितलं की, तो त्याच्या सासूच्या उपचारासाठी २० सप्टेंबरला मुंबईला गेला होता.

सासूच्या उपचारासाठी गेले होते मुंबईला, परतल्यावर घराची हालत बघून गेले 'कोमात'
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये चोरांनी एका घरात मोठी चोरी करत आहे. येथील आजाद नगरमधील सासूला दवाखान्यात दाखवण्यासाठी मुंबईला गेले होते. जेव्हा ते गुरूवारी परतले तेव्हा घरातील नजारा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चोर त्यांच्या घरातून साधारण ६ लाख रूपयांचे दागिने आणि ५० हजार रूपये नगदी घेऊन पसार झाले. असं सांगितलं जात आहे की, चोरांनी साधारण ७ लाख किंमतीचे दागिने आणि काही रक्कम लुटली.
मीडिया रिपोर्टनुसार, शमशेर आपल्या सासूच्या उपचारासाठी मुंबईला गेला होता. त्याने सांगितलं की, तो त्याच्या सासूच्या उपचारासाठी २० सप्टेंबरला मुंबईला गेला होता. शमशेर शेजारच्या घरी चावी देऊन गेला होता. शमशेरने सांगितलं की, त्यांचे शेजारी बुधवारी येऊन त्यांचं घर बघून गेले होते. त्यावेळी घरात सगळं काही ठीक ठाक होतं. असा अंदाज आहे की, चोरांना याची खबर लागली होती की, घरात कुणीही नाही. याचाच फायदा घेत बुधवारी रात्री चोरीची घटना घडली.
पीडित शमशेरने सांगितलं की, चोर समोरचा दरवाजा तोडून घरात शिरले होते आणि चोरी केल्यावर मागच्या दरवाज्यातून पसार झाले. त्यांनी सांगितलं की, चोरांनी दागिने आणि रोख रक्कम पळवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची चौकशी सुरू केली. पण अजूनही पोलिसांच्या हाती चोर लागले नाहीत.