मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचलेल्या कपलने अचानक खाल्लं विष, नवरदेवाचा मृत्यू; नवरी गंभीर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:25 IST2023-05-18T13:23:49+5:302023-05-18T13:25:22+5:30
Crime News : असं सांगितलं जात आहे की, दोघांमध्ये लग्नाआधी काही वाद झाला होता. ज्यानंतर तरूणाने विष पिऊन आत्महत्या केली.

मंदिरात लग्न करण्यासाठी पोहोचलेल्या कपलने अचानक खाल्लं विष, नवरदेवाचा मृत्यू; नवरी गंभीर...
Crime News : मध्य प्रदेशच्या इंदुरमधून लग्नादरम्यानची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लग्नादरम्यान असं काही झालं की, नवरी आणि नवरदेवाने कथितपणे विष प्यायलं. यानंतर 21 वर्षीय नवरदेवाचा मृत्यू झाला तर नवरीची स्थिती गंभीर आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघांमध्ये लग्नाआधी काही वाद झाला होता. ज्यानंतर तरूणाने विष पिऊन आत्महत्या केली.
अधिकारी म्हणाले की, नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं. तर नवरी जीवनाशी लढाई करत आहे. मीडियासोबत बोलताना पोलीस अधिकारी रमजान खान यांनी सांगितलं की, कनाडिया भागातील एका आर्य समाज मंदिरात लग्न होणार होतं. दोन्ही परिवारांच्या सहमतीने हे लग्न होणार होतं.
काही वादानंतर नाराज झालेल्या नवरदेवाने विष प्यायलं आणि आपल्या 20 वर्षीय नवरीला याबाबत सांगितलं. नवरीला जसं समजलं की, आपल्या नवरदेवाने विष प्यायलं तसं लगेच तिनेही विष प्यायलं. कसंतरी नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तेच नवरीची स्थिती फार गंभीर आहे.
पोलिसांनुसार, नवरदेवाच्या परिवाराने सांगितलं की, महिला खूप आधीपासून मुलावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि जेव्हा मुलाने करिअरच्या दृष्टीने दोन वर्षांचा वेळी मागितला तेव्हा महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. काही महिन्यात दोघांनी साखरपुडा केला. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.