धक्कादायक! चटणी चांगली बनवली नाही म्हणून पत्नीची हत्या; आरोपी पती फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 22:31 IST2021-08-02T22:30:57+5:302021-08-02T22:31:30+5:30
चटणी रुचकर बनवली नाही म्हणून एका माथेफिरू पतीनं पत्नीची हत्या केली आहे.

धक्कादायक! चटणी चांगली बनवली नाही म्हणून पत्नीची हत्या; आरोपी पती फरार
मध्य प्रदेशच्या दतिया येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चटणी रुचकर बनवली नाही म्हणून एका माथेफिरू पतीनं पत्नीची हत्या केली आहे. आनंद गुप्ता नावाच्या व्यक्तीचं सामोरे आणि कचोरीचं दुकान आहे. यासाठी लागणारी चटणी आनंद गुप्ताची पत्नी घरीच तयार करायची. रविवारी देखील त्याच्या पत्नीनं नेहमीप्रमाणं घरीच चटणी तयार केली.
आनंदनं चटणी चाखून पाहिली तर ती व्यवस्थित झाली नव्हती. अशा शुल्लक कारणावरुन आनंद यानं पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या आईनं त्याला थांबविण्याचा प्रयत्न देखील केला. पण त्यानं कुणाचं काही न ऐकता पत्नीला मारहाण करणं सुरूच ठेवलं यात तिचा मृत्यू झाला.
पत्नीची हत्या करून आनंद गुप्ता घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी आनंदचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.