आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:41 IST2025-10-19T09:38:03+5:302025-10-19T09:41:21+5:30
मध्य प्रदेशात तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राची निघृणपणे हत्या केली.

आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशात हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये तीन तरुणांनी त्यांच्या मित्राचा गळा चिरला आणि नंतर दगडाने त्याचे डोके ठेचून त्याची हत्या केली. एका आरोपीला त्याच्या आईचे आणि मृताचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. दोन दिवसांपूर्वी आरोपीने त्याला घराच्या आसपास न दिसण्यास सांगितले होते आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये या धक्कादायक हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने त्याच्या आईशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या मित्राची हत्या केली. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास, श्याम नगर मल्टी येथे एका मृतदेह सापडल्याची तक्रार पोलिसांना मिळाली तेव्हा ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना मृत व्यक्ती आशिष उइके असल्याचे समोर आले. त्याचा गळा चिरलेला आणि त्याचे डोके दगडाने ठेचलेले होते. शवविच्छेदन अहवालानुसार, आशिषचा गळा धारदार शस्त्राने गंभीरपणे चिरण्यात आला होता, ज्यामुळे तो लगेचच बेशुद्ध झाला. त्यानंतर आरोपीने त्याचे डोके आणि चेहरा एका मोठ्या दगडाने चिरडला, ज्यामुळे तो ओळखता आला नाही. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला दगड सापडला. मृतदेह इतका वाईट स्थितीत होता की कुटुंबातील सदस्यांनाही तो ओळखणे कठीण झाले. कपडे आणि मोबाईल फोनवरून ओळख पटली अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी रणजितला आशिषचे त्याच्या आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरुनच त्यांच्यात वाद झाला. आशिषचा विनय यादव आणि निखिल यादव यांच्याशीही बराच काळ वाद सुरु होता. दोन दिवसांपूर्वी रणजित ठाकूरने आशिषला इशारा दिला होता की जर तो त्याच्या घराजवळ दिसला तर तो त्याला मारून टाकेल. शनिवारी पहाटे जेव्हा आशिष पुन्हा रणजीतच्या घरी पोहोचला तेव्हा रणजीत, विनय आणि निखिल आधीच तिथे होते. त्या तिघांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार मारले. रणजीत आणि आशिष पूर्वी जवळचे मित्र होते आणि आशिष वारंवार रणजीतच्या घरी येत असे.
रणजितने आधी त्याच्या डोक्यावर मागून दगड मारला आणि तो जमिनीवर पडला तेव्हा त्या तिघांनी त्याचा गळा चिरला. नंतर जवळच असलेल्या दगडाने त्याचे डोके ठेचले आणि आरोपी फरार झाले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आशिषच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्याची आई म्हणाली, "माझा मुलगा निर्दोष होता. तो फक्त कामासाठी तिथे जात होता. या जनावरांनी त्याला विनाकारण मारले." शेजाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, आशिष शांत स्वभावाचा होता आणि त्याने कधीही कोणताही राग मनात ठेवला नाही.