शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:04 PM

घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली.

ठळक मुद्देमाटुंगा पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.तरुणीने आरडाओरडा करीत टॅक्सी थांबविली. तोपर्यंत दुचाकीस्वार पळून गेला होता. दुचाकीवर दोघे होते. ते अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते.

मुंबई - चालत्या टॅक्सीतून ग्राफीक डिझायनर तरुणीचा आयफोन पळविण्यात आल्याची घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली. या प्रकरणी बुधवारी माटुंगा पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.कुर्ला परिसरात तक्रारदार ग्राफीक डिझायनर अश्विनी प्रेमनाथ वाडकर (२९) राहण्यास आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी तिने टॅक्सी पकडली. आयफोन ७ हा मोबाइल तिने बाजूलाच सीटवर ठेवला होता. साडेदहाच्या सुमारास टॅक्सी किंग्ज सर्कल ब्रिजवरून जे. एम. मेहता पुलावर पोहोचताच मागावर असलेल्या दुचाकीस्वार तरुणाने टॅक्सीच्या उघड्या असलेल्या काचेच्या भागातून हात घालून मोबाइल पळवला.तरुणीने आरडाओरडा करीत टॅक्सी थांबविली. तोपर्यंत दुचाकीस्वार पळून गेला होता. या प्रकरणी तरुणीने माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, बुधवारी माटुंगा पोलिसांनी मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवर दोघे होते. ते अंदाजे २० ते २५ वयोगटातील होते. तरुणीने केलेल्या त्यांच्या वर्णनावरून माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीचा क्रमांक शोधण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :RobberyदरोडाMobileमोबाइलTaxiटॅक्सीPoliceपोलिस