विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्येनंतर मृतदेह जाळला; 2 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:43 IST2021-02-09T15:34:00+5:302021-02-09T15:43:33+5:30
Crime News : मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. भयंकर बाब म्हणजे हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला.

विकृतीचा कळस! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्येनंतर मृतदेह जाळला; 2 जणांना अटक
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोतिहारी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. भयंकर बाब म्हणजे हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोतिहारीतील कुंडवा चैनपुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी ही घटना ही घटना घडली. मोतिहारीच्या कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेपाळच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी दोन फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुंडवा चैनपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे.
माणुसकीला काळीमा! वृद्धेवर सामूहिक बलात्कार, आरोपी फरारhttps://t.co/ThDOOBSDsE#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) February 5, 2021
शेवटी दोन फेब्रुवारी रोजी पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला. मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कार आणि तिची हत्या केल्याचा आरोप केला. तक्रारीमध्ये चार जणांवर आरोप करण्यात आले आहेत. तर सात जणांवर मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींच्या अटकेसाठी पथक नेमण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! 80 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परिसरात खळबळ
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 80 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. घरात कोणीही नसताना सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील खरेला गावात ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार, वृद्ध महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.
निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान 17 वर्षाच्या मुलीने सांगितला भयंकर अनुभव, केला धक्कादायक खुलासा https://t.co/IqopzCmV6J#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) January 19, 2021
माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये ही घटना घडली असून आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे.
धक्कादायक! मुलीची मावशीच आहे मुख्य आरोपी, 8 जणांना अटकhttps://t.co/m8VQq739mf#crime#Rape#Police
— Lokmat (@MiLOKMAT) February 2, 2021