रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आई;महिलेची शिर धडापासून केलं वेगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 20:57 IST2021-06-05T20:55:50+5:302021-06-05T20:57:19+5:30

Murder case : या हत्येमागे जुने शत्रुत्व किंवा लूटमारीची शक्यता नाकारता येत नाही.

The mother was in a bloody situation; the woman's head was separated from the body | रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आई;महिलेची शिर धडापासून केलं वेगळं

रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आई;महिलेची शिर धडापासून केलं वेगळं

ठळक मुद्देरात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा तो आला तेव्हा त्याने पाहिले की, आई अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.

रोहतकच्या मस्तनाथ नगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुध डेअरीमध्ये एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली. ४५ वर्षीय महिला सुनीताचा मृतदेह घराच्या अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. रात्री उशिरापर्यंत पोलीस या घटनेच्या तपासात व्यस्त होते. या हत्येमागे जुने शत्रुत्व किंवा लूटमारीची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तनाथ नगर येथे राहणाऱ्या आनंदने घराच्या आत दुध डेअरी उघडली असून त्यात तो पाच-सहा म्हशी ठेवतो. संध्याकाळी त्याचा मुलगा दूध पुरवठा करण्यासाठी गेला. रात्री साडेआठच्या सुमारास जेव्हा तो आला तेव्हा त्याने पाहिले की, आई अंगणात रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती.

जेव्हा मी जवळ गेलो तेव्हा आईची मान शरीराबाहेर होती. त्याने तातडीने आपल्या वडिलांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. आयएमटी स्टेशन प्रभारी कुलदीप सिंग आपली टीम व सीआयएसमवेत घटनास्थळी पोहोचले. एफएसएल तज्ज्ञ डॉ. सरोज दहिया यांना गुन्हेगारीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. रात्री 10.30 वाजेपर्यंत पोलिस घटनेचे गूढ सोडविण्यात व्यस्त होते.



11 दिवसांत 5 वा खून
गेल्या 11 दिवसात जिल्ह्यातील पाचव्या हत्येनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 24 मे रोजी एकाच दिवसात तीन खून झाले. जमिनीच्या वादामुळे सांघी व बहु अकबरपूर गावात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, तर अस्थल बोहार माजरा गावात जुन्या वैमनस्यातून एकाची हत्या झाली. गुरुवारी कथनौर येथील महिलेचा मृतदेह रीठल गावाजवळच्या कालव्यात सापडला. महिलेचे दोन्ही हात बांधले होते. मस्तनाथ नगरमध्ये आता एका महिलेची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. या घटनांमुळे एकाच खळबळ माजली आहे. 

Web Title: The mother was in a bloody situation; the woman's head was separated from the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.