शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आई गावाला, वडील ड्युटीवर घरात मुलाची आत्महत्या; मोबाईलच उलगडणार कारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:40 IST

Suicide Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा.

ठळक मुद्देरितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी हरिविठ्ठल नगरात घडली.

जळगाव : आई व भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना रितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी हरिविठ्ठल नगरात घडली. रितेश याच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजलेले नाही, मात्र लाॅक असलेल्या मोबाईलमधूनच काही तरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा. शहरातील एका महाविद्यालयतही त्याने प्रवेश घेतला होता. वडील गुलाबराव सुकलाल मोरे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर वडील   रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे हे ड्युटीवरुन घरी आले तेव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना बोलावुन घेत घराचा दरवाजा तोडला असता रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. ही घटना पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला.

दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे यांनी नागरीकांच्या मदती रितेश याला खाली उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.  दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मुळ गावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण व लहान भाऊ आकाश असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मोबाईलचा लाॅक उघडेनादरम्यान या घटनेनंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच रितेश याने काही सुसाईड नोट लिहिली आहे का यासाठीत्याचे खिसे तसेच इतर ठिकाणी तपासणी केली मात्र तसं काहीच मिळाले नाही. मोबाईल आढळून आला मात्र तो लाॅक होता, तो उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश आले. या मोबाईलमधूनच धागेदोरे मिळतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसJalgaonजळगावMobileमोबाइल