माता न तू वैरिणी! आईने चिरला अडीच महिन्यांच्या लेकीचा गळा, वडिलांनी घेतली रुग्णालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:54 IST2024-02-09T13:57:55+5:302024-02-09T14:54:00+5:30
अंधश्रद्धेतून एका आईने आपल्या चिमुकलीचा गळा चिरला.

फोटो - आजतक
आई आपल्या मुलासाठी जगातील सर्व दुःख सहन करतं. मात्र आईनेच स्वत:च्या हाताने आपल्या मुलाचा जीव घेतल्याचं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून एका आईने आपल्या चिमुकलीचा गळा चिरला.
जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील पारसपूर दुबौली गावात महेंद्रच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. आईने तिच्याच अडीच महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा चिरला. मुलीला वेदना होऊ लागल्याने ती तडफडत होती. हे पाहून वडील महेंद्र यांनी तात्काळ आपल्या मुलीसह जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
जिथे डॉक्टरांनी तातडीने मुलीवर उपचार सुरू केले आणि मुलीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मुलीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. मुलगी जन्मल्यापासूनच आजारी असते.
या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक ओपी सिंह यांनी सांगितलं की, कप्तानगंज पोलीस स्टेशन परिसरात अडीच महिन्यांच्या मुलीला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मुलीला तिच्या वडिलांच्या मदतीने रुग्णालयात पाठवलं. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.